स्वातंत्र्यदिनापासून तरुणांच्या ‘नवसंकल्पने’ची यात्रा

युवक-युवतीच्या नवसंकल्पनेला महाराष्ट्र शासनाच्या स्टार्ट-अप यात्रेचा आधार

स्वातंत्र्यदिनापासून तरुणांच्या ‘नवसंकल्पने’ची यात्रा

महाराष्ट्रातील तरुणांच्या नव्या संकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्यात १५ ऑगस्टपासून ‘महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत, अशी माहिती विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.

तळागाळातील व ग्रामीण भागातील नवोउद्योजकांचा या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे व नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञव्यक्तीकडून मार्गदर्शन तसेच निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे व राज्याची उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या यात्रेचा उद्देश असल्याचे वर्मा यांनी सांगितले. तसेच या उपक्रमा मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ नागपूर येथून होणार आहे. त्याच बरोबर औरंगाबाद, अमरावती आणि पुणे येथूनही त्या त्या विभागातून यात्रेचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ होणार आहे.

मुख्य आकर्षण म्हणजे या यात्रेतील मोबाईल व्हॅन ही राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय आदी ठिकाणी जाऊन स्टार्टअप आणि उद्योजकता विषयी जनजागृती करेल. साहसी नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करून त्यांना माहिती देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

‘सीएनजी’चा तुटवड्यामुळे प्रवाशांचा पंपावर खोळंबा

‘पाच वर्षाची काम अडीच वर्षात करणार’

कैदी नंबर ८९५९ अर्थात संजय राऊत

चंदीगडच्या स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा

 

महाराष्ट्र स्टार्टअप रँकिंगमध्ये अव्वल

स्टार्टअप रँकींग २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य टॉप पेरफॉमन्स श्रेणीमध्ये आले आहे. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन १ बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशातील १०४ युनिकॉर्नपैकी २४ युनिकॉर्न्स म्हणजे २३ टक्के युनिकॉर्न्स महाराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण २ लाख १३ हजार स्टार्टअप्सपैकी ३६ हजार ८०० म्हणजे १८ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स असून अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात ३२ तर नंदुरबार जिल्ह्यात ३७ स्टार्टअप्स आहेत. मुंबई महानगरात १४ हजार ७००, तर पुण्यामध्ये ८ हजार ६०० स्टार्टअप्स आहेत.

Exit mobile version