एलन मस्कची टेस्ला उघडणार मुंबई, दिल्लीत नोकरीची दारे

मागील आठवड्यात नरेंद्र मोदी, एलोन मस्क यांच्यात झालेल्या भेटीनंतरच्या घडामोडी

एलन मस्कची टेस्ला उघडणार मुंबई, दिल्लीत नोकरीची दारे

उद्योगपती एलोन मस्क यांची कंपनी टेस्लाने भारतात भरती सुरू केली आहे. या संदर्भात अर्जही मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही घटना अमेरिकेत एलोन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती आणि या भेटीनंतर काही दिवसांतच टेस्ला कंपनीने भारतात भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे हे इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माती कंपनी भारतात आपले हातपाय पसरू पाहत असल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

अहवालानुसार, टेस्लाने भारतात १३ नोकऱ्यांची यादी जारी केली आहे. यामध्ये ग्राहकांशी संवाद साधणारे आणि बॅक- एंड संबंधित भूमिका असणाऱ्या नोकऱ्या समाविष्ट आहेत. सोमवारी कंपनीच्या लिंक्डइन पेजवर या नोकऱ्यांच्या जाहिराती दिसून आल्या आहेत. टेस्ला मुंबई आणि दिल्लीमध्ये सेवा तंत्रज्ञ आणि सल्लागार भूमिकांसह विविध पदांसाठी उमेदवार शोधत आहे. ग्राहक सहभाग व्यवस्थापक आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ यासारख्या इतर नोकऱ्या विशेषतः मुंबईसाठी आहेत.

एलोन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये भेट झाली. दोघांमधील चर्चेत भारत- अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याचे मुद्दे समाविष्ट होते, ज्यामध्ये धोरणात्मक तंत्रज्ञान तसेच संरक्षण औद्योगिक सहकार्य आणि नागरी अणुऊर्जेवर लक्ष केंद्रित केले गेले. त्यांनी परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्द्यांवरही चर्चा केली.

यापूर्वीही टेस्लाने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी रस दाखवला होता. परंतु, उच्च आयात शुल्कामुळे हा विषय काहीसा लांबला गेला होता. सरकारने अलीकडेच ४०,००० डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या उच्च दर्जाच्या कारवरील मूलभूत सीमा शुल्क ११० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे, ज्यामुळे देश लक्झरी ईव्ही उत्पादकांसाठी अधिक आकर्षक बाजारपेठ बनला आहे. चीनच्या तुलनेत भारतातील ईव्ही बाजारपेठ अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी टेस्ला नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत असल्याने त्यांच्यासाठी ही एक संधी आहे.

हे ही वाचा : 

कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

युवा लेखक म्हणून विवान कारुळकरला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

केरळच्या पलक्कडमध्ये झळकले हमास, हिजबुल्ला दहशतवाद्यांचे पोस्टर्स

गेल्या वर्षी भारतातील ईव्ही विक्री १,००,००० युनिट्सच्या जवळ पोहोचली असली तरी, चीनच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, जिथे याच काळात १.१ कोटी ईव्ही विकल्या गेल्या. तथापि, भारत सरकार स्वच्छ ऊर्जा उपायांवर भर देत असल्याने आणि ईव्ही स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याने, टेस्लाला बाजारात क्षमता दिसत आहे.

…हे १० जनपथपर्यंत जाणार काय? | Dinesh Kanji | Narendra Modi | Donald Trump | USAID | Biden

Exit mobile version