जगातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतात शिरकाव करत आहे. त्यासाठी कंपनीला काही प्रमाणात आयात करात सुट मिळावी अशी अपेक्षा जात आहे. त्याबरोबरच कंपनीला भारतात अजून काही प्रोत्साहने देखील मिळावीत अशी आशा आहे.
टेस्लाने भारत सरकारकडे आयात करात सुट देण्यासाठी विनंती केली आहे. ही सुट संपूर्ण तयार गाड्यांसाठी मागण्यात आली आहे.
अमेरिकन वाहन उत्पादक टेस्लाने ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे. या कंपनीच्या $४०,००० किंमतीपेक्षा कमी किंमत असलेल्या गाड्यांवर सध्या ६० टक्के आयात शुल्क लागू होते तर त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांसाठी १०० टक्के शुल्क लागू होते. या दोन्ही आयात शुल्कांत घट करून ती ४० टक्क्यांच्या आसपास आणण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा:
लोकहित जोपासण्याचा शिवसेनेशी संबंध काय?
महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून
रिलायन्सच्या नावाने ‘हा’ नवा विक्रम
आसाम-मिझोराम सीमासंघर्षाला हिंसक वळण
टेस्लाने त्यांच्या उत्पादनांची इलेक्ट्रीक वाहने म्हणून गणना करावी आणि त्या गाड्यांना आलिशान गाड्या म्हणून गणू नये असे मत व्यक्त केले आहे.
या संदर्भात घेतला जाणारा निर्णय हा एका विशिष्ट कंपनीसाठी नसून संपूर्ण क्षेत्रासाठी ही करातील सूट लागू असेल असे सांगितले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून सातत्याने इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे सरकार देशांतर्गत इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे.
सरकार जागतिक पातळीवरील मोठ्या वाहन उत्पादकांच्या संपर्कात असून, भारतातच वाहन उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे. भारत सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्याबरोबरच देशात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन चालू करण्यासाठी त्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला होता.
सरकार अशा वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे अशा वाहनांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर सरकारकडून दीड लाख रुपयांपर्यत सूट देत आहे.
सध्याच्या कररचनेत इलेक्ट्रीक वाहने आणि विद्युत वाहनांमध्ये फरक करत नाही.