फोर्डच्या कर्मचाऱ्यांना टाटा तारणार?

फोर्डच्या कर्मचाऱ्यांना टाटा तारणार?

तामिळनाडू सरकार चेन्नईतील मरैमलाई नगर येथे फोर्ड इंडिया वाहन कारखान्याच्या संभाव्य अधिग्रहणाबाबत टाटा समूहाशी चर्चा करत आहे. असे एका उच्च सरकारी सूत्राने गुरुवारी इकॉनॉमिक टाइम्सला (ईटी) सांगितले.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री एमके स्टालिन आणि राज्याचे उद्योगमंत्री थंगम थेन्नारासू यांच्याशी भेट घेतल्याच्या बातमीनंतर टाटा मोटर्सच्या शेअर्सचा भाव १.७१ % ने वाढला. दोन आठवड्यांच्या कालावधीत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेची ही दुसरी फेरी असल्याचे सांगितले जात होते. २७ सप्टेंबर रोजी टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

या बैठकीचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असल्याने, अंतिम निर्णयाची घोषणाही मुख्यमंत्र्यांकडूनच होईल.

ईटीच्या प्रश्नांना उत्तर देताना टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, चंद्रशेखरन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि बाकी सर्व काही निव्वळ चर्चा आहेत.

फोर्डच्या मरईमलाई नगर प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता २००,००० वाहने आणि ३४०,००० इंजिन आहे. त्यात इकोस्पोर्ट आणि एन्डेव्हर ही उत्पादने तयार करण्यात आली. त्यांची निर्यात ३० पेक्षा अधिक देशांत केली गेली. अमेरिकन कार उत्पादक कंपनीने प्लांटमध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती. फोर्डचा गुजरातमधील साणंद येथे कारखाना आहे.

हे ही वाचा:

६८ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय

महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार

फोर्डने भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांचे कर्मचारी भविष्याकडे चिंतातूर होऊन पाहत होते. कंपनीचे भारतात सुमारे १७० डीलर भागीदार आहेत आणि ते एकत्रितपणे सुमारे ४०० शोरूम चालवतात. असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या आकडेवारीवरून दिसून आले.

Exit mobile version