टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप

टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप

सध्याच्या जमाना हा डिजीटल आहे. डिजिटल पेमेंट्सचा वापर हा सध्या सर्रास होताना दिसतो. २ रुपयांपासून ते अगदी हजारो रुपया पर्यंतचे व्यवहार डिजिटल पेमेंट ऍप्सच्या माध्यमातून होताना दिसतात. आता याच नव्या क्षेत्रात टाटा ग्रुपची एंट्री होत आहे. टाटा ग्रुपच्या मध्यमातून लवकरच डिजिटल पेमेंटचे नवे ऍप्लिकेशन बाजारात येणार आहे.

युनायटेड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआय प्रकारातील हे टाटाचे नवे ऍप्लिकेशन असणार आहे. या ऍप्लिकेशनच्या लॉन्चिंगची सर्व तयारी टाटा समूहाने केली असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी यंत्रणेकडून त्यानं हिरवा कंदील मिळणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात या ऍप्लिकेशनचे लोकार्पण होणार असून ग्राहकांना हे ऍप डाउनलोड करून वापरणे शक्य होणार आहे.

हे ही वाचा:

…. म्हणून मविआ नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही!

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

टाटा न्यू असे या नव्या ऍपचे नाव असणार आहे. भिम, गुगल पे, फोन पे, ऍमेझॉन पे, पेटीएम अशी विविध पेमेंट ऍप्स बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहेत. त्यांनी आपले ग्राहक बांधून ठेवले आहेत. पण अशातच आता त्यांना टाटाच्या न्यू या नवीन ऍपशी स्पर्धा असणार आहे.

टाटा न्यू या ऍपचा वापर करून व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना न्यू कॉईन्स प्राप्त होणार आहेत. या न्यू कॉईन्सची किंमत म्हणजे १ कॉईन म्हणजे १ रुपया अशा प्रकारे असणार आहे. या न्यू कॉईन्सचा वापर करून भविष्यातील व्यवहार करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.

Exit mobile version