टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले

आयपीओची अंतिम किंमत ५०० रुपये होती

टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले

देशातील प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा सामुहाच्या कंपनीच्या टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले आहेत. कंपनीचे शेअर्स बीएसईवर १४० टक्के प्रीमियमसह १ हजार २०० रुपयांपासून सुरू झाले आहेत. तर त्याच्या आयपीओची अंतिम किंमत ५०० रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर ७०० रुपये कमावले आहेत.

जवळपास दोन दशकांनंतर म्हणजेच, २० वर्षांनंतर, टाटा समूहानं त्यांच्या टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बाजारात आणला आणि गुंतवणूकदारांनी तो लगेचच स्वीकारला. टाटा टेक शेअर्सनी NSE आणि BSE वर बंपर लिस्टिंगसह व्यवहार सुरू केला. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमतीला टाटांच्या शेअर्सची लिस्टिंग झाली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स बीएसईवर १ हजार २०० रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. टाटा टेक शेअर्स थेट १४० टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाले आहेत. टाटा टेकच्या ५०० रुपयांच्या इश्यू किंमतीच्या तुलनेत ही लिस्टिंग विलक्षण आहे. गुंतवणूकदारांना प्रति शेअर ७०० रुपयांचा थेट फायदा झाला आहे.

हे ही वाचा:

फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?

४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार

टाटा टेकचा आयपीओ २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता आणि कंपनीनं शेअर्सची किंमत ४७५ रुपये ते ५०० रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली होती. टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर बाजारात नोव्हेंबर २०२१ नंतर सर्वोत्तम लिस्टिंग झाल्यच्या चर्चा आहेत.

Exit mobile version