अहमदाबादमध्ये उभा राहणार टाटा मोटर्सचा स्क्रॅपेज कारखाना

अहमदाबादमध्ये उभा राहणार टाटा मोटर्सचा स्क्रॅपेज कारखाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘व्हेहिकल स्क्रॅपेज पॉलिसी’ अर्थात जुन्या गाड्या भंगारात काढण्याबद्दलची पॉलिसी जाहिर केली. त्यानंतर देशातील प्रसिद्ध वाहन उद्योजक टाटा मोटर्स यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटांच्या या निर्णयामुळे जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या योजनेला बळ मिळणार आहे.

टाटा मोटर्स आणि गुजरात राज्य सरकार यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे. या करारान्वये टाटा मोटर्स अहमदाबाद शहरात जुन्या गाड्यांचना भंगारात काढण्याचा कारखाना सुरू करणार आहे. हा करार बंदरे आणि वाहतूक मंत्रालयाच्या मार्फत झाला असल्याचे कळले आहे.

या योजनेनुसार, टाटा मोटर्स उभारत असलेला या कारखान्यात वर्षाला ३६,००० वाहनांवर प्रक्रिया केली जाईल. त्यायोगे या गाड्यांचा पुनर्वापर केला जाणार आहे. या गाड्यांमध्ये खासगी गाड्यांसोबतच व्यावसायिक गाड्यांचा देखील समावेश असेल.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात सत्तांतर होणार?

…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांचा राजीनामा

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

गुजरातच्या बंदरे आणि वाहतूक विभाग टाटा मोटर्सला या कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या आणि पाळाव्या लागणाऱ्या अटींच्या पूर्ततेसाठी मदत करणार आहे.

व्हेहिकल स्क्रॅपेज पॉलिसीनुसार गाड्यांच्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्रालय देखील या कारखान्याच्या उभारणीत सहाय्य करणार असल्याचे समजले आहे.

टाटा मोटर्सचे उच्चाधिकारी गिरीश वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने गाड्यांना भंगारात काढण्याच्या उद्योगात आपला सहभाग नोंदवला आहे ही, टाटा मोटर्ससाठी ऐतिहासिक घटना आहे. त्याबरोबरच त्यांनी असे देखील म्हटले भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय परिवहन मंत्रालयाने घेतलेला व्हेहिकल स्क्रॅपेज पॉलिसीचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. स्वच्छ आणि सुरक्षित भारताच्या दिशेने घेतलेला हा योग्य निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे पर्यावरणाचा देखील मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version