टाटा मोटर्सला घसघशीत फायदा

टाटा मोटर्सला घसघशीत फायदा

जग्वार लँड रोव्हरचे (जेएलआर) मालक असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेडने शुक्रवारी नफ्यातील ६७.२ टक्क्यांची घसघशीत वाढ डिसेंबर तिमाहीत नोंदवली. कोरोना काळातील नियम शिथिल झाल्याचा आणि सणासुदीच्या काळातील विक्रमी खरेदीचा परिणाम म्हणून टाटा मोटर्सला घसघशीत फायदा झाला आहे.

भारतात सणासुदीच्या काळात अधिक मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. नोव्हेंबरच्या मध्यात मोठ्या प्रमाणात सण येऊन गेले. कोविड-१९ महामारीनंतर लोक अधिक मोठ्या प्रमाणात वैयक्तिक गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे वाहन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक वाहनांच्या मागणीतील वाढ नोंदली आहे.

टाटा मोटर्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणातील सणामुळे आणि लोकांच्या मोठ्या प्रमाणातील वैयक्तिक गाड्यांच्या मागणीमुळे वैयक्तिक गाड्यांच्या व्यवसायाने गेल्या ३३ तिमाहीतील सर्वात जास्त नफा नोंदवला आहे.

तिसऱ्या तिमाहीसाठी कंपनीचा एकूण निव्वळ नफा ₹२९.०६ बिलियन इतका नोंदला गेला होता, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ₹१७.३८ बिलियन इतका नोंदला होता.

वैयक्तिक गाड्यांच्या विक्रित वाढ झाली असली तरी महागड्या गाड्यांच्या क्षेत्रात मात्र मागील तिमाहीत तोटा नोंदला गेला होता. माहमारीमुळे या क्षेत्रातील विविध बाजारपेठांमधील मंदीचा हा परिणाम होता.

वाहन उद्योगात तेजी असताना जागतिक वाहन उद्योगासमोर प्रोसेसिंग चिप्स आणि वहनासाठी वापरायचे कंटेनर यांच्या तुटवड्याचे मोठे आव्हान आहे.

Exit mobile version