तब्बल अठरा वर्षांनी येणार टाटा समूहाचा आयपीओ

तब्बल अठरा वर्षांनी येणार टाटा समूहाचा आयपीओ

टाटा उद्योग समूह हा देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. चहापासून ते विमानापर्यंत सगळ्याच क्षेत्रात टाटा समूह सर्वोच्च स्थानावर आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये एकूण टाटाच्या १७ कंपन्या लिस्टेड आहेत. भारतातील विश्वासू ब्रॅण्डमध्ये टाटाचं नाव आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांचा टाटाच्या कंपनीत गुंतणूक करण्याकडे जास्त कल असतो. आता टाटा समूह तब्बल १८ वर्षांनी आयपीओ घेऊन येणार असून, गुंतवणूक दारांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

२००४ साली टाटाचा शेवटचा आयपीओ आला होता. त्यावेळी टाटाने टीसीएसचा आयपीओ आणला होता. टीसीएस लिस्टिंग होत असताना जवळपास साडे पाचशे कोटी कंपनीने उभे केले होते. सध्या टाटा समूहातील टीसीएस हीच कंपनी सर्वात जास्त मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. यानंतर तब्बल १८ वर्षांनी टाटा समूह टाटा टेकनॉलॉजिचा आयपीओ बाजारात घेऊन येणार आहे. टाटा टेक ही कंपनी टाटा मोटर्सची सबसिडी आहे. प्रॉडक्ट इंजिनीरिंग आणि डिजिटल सर्व्हिसेस मध्ये ही कंपनी कार्यरत आहे. टाटा मोटर्सची टाटा टेकमध्ये ७० टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी आहे. तर अल्फा टीसीचे टाटा टेकमध्ये ९ टक्के हिस्सेदारी आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडची ४ पूर्णांक ४८ टक्के टाटा मोटर्समध्ये हिस्सेदारी आहे. सध्या टाटा समूहाने टाटा टेकचा आयपीओ बाजारात आणण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.

हे ही वाचा:

सोनिया गांधी माफी मांगो…मुंबईत भाजपाची निदर्शने

शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!

भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

तसेच टाटा समूहाचा दुसरा मोठा आयपीओ बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. तो आयपीओ म्हणजे टाटा स्काय. टाटा स्काय मार्च २०२३ मध्ये आयपीओ घेऊन येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. टाटा स्कायने अजून तरी सेबीकडे कोणताही अर्ज पाठवलेला नाही. टाटा स्कायच्या आयपीओकडे विदेशी गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version