सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे . केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी करून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून बाद झाल्या. या निर्णयानंतर देशभरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने याचिकाकर्ते, केंद्र आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचा तपशीलवार युक्तिवाद ऐकल्यानंतर ७ डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना आपली कामे सोडून रांगेत उभे राहावे लागले. रांगेत उभे असताना काही लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मोदी सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.