लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. ही खुशखबर येता येताच ऋषी सुनक यांच्या घरात लक्ष्मीही अवतरली आहे. त्यांची पत्नी आणि इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता यांच्याबाबतही एक मोठी बातमी समोर आली आहे. अक्षता मूर्ती यांना २०२२ मध्ये इन्फोसिसमधील समभागापोटी १२६.६१ कोटी रुपयांचा लाभांश मिळाला आहे.
इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिने सप्टेंबरच्या अखेरीस इन्फोसिसमध्ये ३.८९ कोटी म्हणजेच ०.९३ टक्के शेअर्स ठेवले होते. मंगळवारी मुंबई शेअर बजाजरात प्रति समभाग १,५२७. ४० रुपये या किमतीने त्यांची कंपनीतील हिस्सेदारी ५,९५६ कोटी रुपये आहे. इन्फोसिस ही भारतातील सर्वोत्तम लाभांश देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
इन्फोसिसने या वर्षी ३१ मे रोजी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १६ रुपये अंतिम लाभांश दिला.
हे ही वाचा:
बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज
मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी
चालू वर्षासाठी, या महिन्यात कंपनीने १६.५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे, कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लाभांशांची एकूण रक्कम ३२.५ रुपये प्रति शेअर आहे. त्यानुसार अक्षता यांना लाभांशापोटी १२६. ६१ कोटी रुपये मिळाले आहेत. २०२१ मध्ये, त्याने प्रति शेअर ३० रुपये एकूण लाभांश दिला, ज्यामुळे अक्षताला याना त्या वर्षात एकूण ११९.५ कोटी रुपये मिळाले.
अक्षता यांचा जन्म हुबळी येथे १९८० मध्ये झाला. कॅलिफोर्नियातील क्लेरेमॉन्ट मॅकेन्ना कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि फ्रेंच भाषेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी डेलॉइट आणि युनिलिव्हर येथेही काम केले. त्यानंतर तिने लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडायझिंगमध्ये कोर्स केला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षणही घेतले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातच अक्षता आणि ऋषी यांची भेट झाली. दोघांनी २००९ मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुली आहेत.