शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्सची ८०,००० पार उसळी

निफ्टीचीही मोठी मजल

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्सची ८०,००० पार उसळी

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार, ३ जुलै रोजी शेअर बाजाराने मोठी उसळी मारल्याचे चित्र आहे. बुधवारी शेअर बाजराची सुरुवात विक्रमी कामगिरीने झाली. सेन्सेक्सनं आत्तापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. सकाळच्या सत्रात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सनं तब्बल ८०,०१३.७७ अंकांवर उसळी घेतली आहे. त्याचबरोबरीने निफ्टीनंही सकाळच्या सत्रात २४,२९१.७५ अंकांची मजल मारत जबरदस्त सुरुवात केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

बुधवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने ०.७२ टक्क्यांची भर घालत ८०,०१३.७७ अंकांवर मजल मारली. शेअर बाजाराच्या पहिल्यांदाच सेन्सेक्स ८० हजारांच्या वर गेला आहे. त्याचवेळी ०.७ टक्क्यांची भर घालत निफ्टीनं २४,२९१.७५ अंकांपर्यंत मजल मारली.

बुधवारी शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स ४८१.४४ अंकांनी उसळला. तो ७९,९२२.८९ अंकावर खुला झाला. त्यानंतर काही मिनिटांनीच सेन्सेक्स ५७२ अंकांनी वधारला. सेन्सेक्स ८०,००० अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. ८०,०३९.२२ अंकांचा स्तर गाठला. मंगळवारी सेन्सेक्स दुपारनंतर मंदावला होता. तर, निफ्टी १८.१० अंकांनी घसरुन २४,१२३.८५ अंकावर बंद झाला. तर सेन्सेक्स ३४.७३ अंकानी घसरुन ७९,४४१.४६ वर बंद झाला होता.

हे ही वाचा:

अमरनाथ यात्रेकरूंसाठी लष्कराचे जवान बनले देवदूत; ब्रेक फेल झालेल्या बसला थांबवण्यात यश

बांसुरी स्वराज यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; राहुल गांधींच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन

धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल

दरम्यान, निफ्टीच्या आजच्या कामगिरीमध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या किमती ३.५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी झेप घेतल्यामुळे बँकिंग, वित्तसेवा आणि खासगी बँकांच्या शेअर्सनंही नफ्याच्या दिशेनं वाटचाल करत १.३ टक्के ते १.५ टक्क्यांपर्यंत मजल मारली. एचडीएफसी बँकेप्रमाणेच आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि नेस्ले यांनी चांगली कामगिरी केली. त्याचवेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टिसीएस, सन फार्मा, इन्फोसिस, टाटा मोटर्स यांचे शेअर्स खाली आल्याचं दिसून आलं.

Exit mobile version