शेअर बाजाराचे कामकाज संपल्यावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८६१. २५ अंकांनी गडगडत ५७,९७२. ६२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक देखील २२३.१० अंकांनी घसरून १७,३३५. ८० अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराला माेठा फटका बसला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. दिवसभरात तर सेन्सेक्स १४६६. ४अंकांनी घसरला हाेता. निफ्टी ३७० अंकांनी घसरून१७,१८८.६५ अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर बाजारात काहीशी सुधारणा दिसून आली. दिवसभरात बाजार सावरेल असे वातावरण नव्हते. त्यामुळे बाजाराचे कामकाज संपल्यानंतर सेन्सेक्स ८०० पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचं दिसून आलं.
सेन्सेक्स यादीतील टेक महिंद्रा सर्वात जास्त ४.५७ टक्क्यांनी घसरला, त्यानंतर इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे समभाग घसरला. दुसरीकडे मारुती, नेस्ले, एशियन पेंट्स, आयटीसी, महिंद्र , हिंदुस्तान यूनिलिव्हर यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली.
शेअर बाजारातील घसरणीमुळे आज रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी घसरून ८०.१५ रुपयांवर आला. या घसरणीचे श्रेय परदेशात अमेरिकन चलन मजबूत होणे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आहे.
हे ही वाचा:
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!
फेडरलच्या विधानाचा परिणाम
चलनवाढीला आळा घालण्यासाठी काही काळ उच्च व्याजदर कायम ठेवण्याचे संकेत यूएस फेडच्या प्रमुखांनी दिल्यानंतर आज भारतीय रुपयात मोठी घसरण झाली. मागील सत्राच्या ७९.८७ च्या बंद होताना रुपया प्रति डॉलर ८०.११ पर्यंत खाली घसरला. शुक्रवारी, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सेंट्रल बँकर्सच्या जॅक्सन होलच्या बैठकीत सूचित केले की महागाई नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक धोरण दीर्घकाळापर्यंत असेल. पाॅवेल यांच्या या विधानाचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाल्याचं दिसून आलं