महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था आता सावरू लागलेली आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या खजिन्यात भरघोस जीएसटी जमा झाला आहे. कोरोनाच्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेची गती संथ झाली होती, त्यात केंद्राने जीएसटीचा परतावा करावा ही मागणी करणाऱ्या राज्य सरकारच्या खजिन्यात मात्र सर्वाधिक जीएसटी जमा झाला आहे.
जुलैमध्ये मात्र चित्र चांगलेच बदलले असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रात तब्बल ३८ टक्के जीएसटी महसूल जमा झालेला आहे. एकूणच आकडेवारी पाहता आता हळूहळू अर्थव्यवस्था बाळसे धरू लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. जुलै महिन्यात तब्बल १८८९९ कोटी जीएसटी महसूल जमा झालेला आहे. हाच आकडा जूनमध्ये केवळ १३२७१ कोटी इतकाच होता. तब्बल ५ हजार १७८ कोटींनी महसूलात वाढ झालेली आहे. यंदा झालेल्या टाळेबंदीमध्ये एप्रिल तसेच मे महिन्यात शेतीविषयक लागणारे सामान यांची दुकाने सुरुच होती. त्यामुळेही महसुलात फार मोठ्या प्रमाणावर फरक पडलेला आहे.
कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर महसूलामध्ये वाढ झालेली आहे हे स्पष्ट होते आहे. निर्बंध असेच शिथिल राहिले तर हा महसूल येत्या काही काळात अधिक वाढेल हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिलेली आहे. जुलैमध्ये १ ते ५ दरम्यान दाखल केलेल्या परताव्याचा समावेश आहे. तो परतावा ४ हजार ९३७ कोटी इतका आहे. कोविड -१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना जूनसाठी रिटर्न भरण्याची मुदतवाढ देण्यात आली होती.
हे ही वाचा:
सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक
महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु
जुलै २०२० च्या तुलनेत बहुतांश राज्यांची कर संकलनात सकारात्मक वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील जमा झालेला महसूल हा देशातील पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यासाठी हाच एक मुख्य मार्ग महसूलासाठी आहे. आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै कडे नजर टाकल्यास जवळपास ६८ टक्के जुलैमध्ये वाढ झालेली आहे. तसेच गतवर्षी एप्रिल २०२० ते जुलै २०२० मध्ये हा आकडा केवळ ४०५५२ कोटी इतका होता. यावर्षी एप्रिल ते जुलैमध्ये हा आकडा ६८ हजार कोटी इतका झालेला आहे. म्हणजेच तब्बल २७,६४७ कोटी इतका वाढलेला महसूल आहे.