मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपनी स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने रिटेल गृहवित्त पुरवठा क्षेत्रातील आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे. ३० जून २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने चांगला व्यवसाय करून जवळपास दुप्पट नफा नोंदवला आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (स्टार एचएफएल) ही छोटी शहरे आणि ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करणारी गृह वित्त कंपनी आहे.
स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या मागील वर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत मालमत्तेत ७३.५५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची मालमत्ता ४७१.४१ कोटी रुपयांवर गेली आहे. शिवाय त्यांना मिळालेल्या निव्वळ व्याजाचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ६१.४३ टक्के वाढले आहे. ३० जून रोजी त्यांचे निव्वळ एनपीए १.१२ टक्के एवढे कमी होते. त्यांचा करपूर्व नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ८७.९८ टक्के वाढला.
स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पेश दवे म्हणाले की, “लवकरच व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५०० कोटी रुपयांच्या वर जाईल. सध्या आमच्या शाखा ३४ शहरांमध्ये असून कर्मचाऱ्यांची संख्या २८० पेक्षा जास्त झाली आहे. लवकरच कार्यालयांची संख्या ५० पेक्षा जास्त करण्याचे आमचे ध्येय आहे.” प्रधानमंत्री आवास योजनेत तीन कोटी जादा घरांची निर्मिती होणार असून या योजनेचा फायदा घेण्यासही कंपनी सज्ज आहे. येत्या दोन-तीन वर्षात रास्त किमतीच्या घरांच्या क्षेत्रात प्रमुख कंपनी बनण्याचा आमचा निर्धार असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा..
“ममता बॅनर्जी यांनी खोट्या गोष्टींवर आधारित कथा तयार करण्याऐवजी खरे बोलावे”
संतांवर जातीय टीका करणाऱ्या मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा
कर्मचाऱ्यांना मालकी हक्क देण्याच्या तत्त्वानुसार स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या संचालक मंडळाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी एसोप दोन योजनेला संमती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वाढीसाठी दिलेले योगदान पाहता संचालक मंडळाने दुसऱ्यांदा ही योजना आणली आहे. संचालक मंडळाने यावर्षीच्या लाभांशातही ५० टक्के वाढ करून तो आता प्रति इक्विटी शेअरमागे साडेसात टक्क्यांवर नेला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर लाभांश दिला जाईल.