सेंट्रल बँकेकडून लस घेतलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी खास भेट

सेंट्रल बँकेकडून लस घेतलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी खास भेट

देशभरात सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घ्यावे यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यात आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने लस घेतलेल्या ज्येष्ठ नागरीकांना ०.५० टक्के किंवा २५ बेसिस पॉईंट वाढवून दिले आहेत.

बँकेने याबाबत ट्वीट केले होते. त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

हा तर ठाकरे सरकारच्या अपयशाचा उद्रेक

मदरशांमधील मुलांचे मौलानानेच केले लैंगिक शोषण

आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी

पाकिस्तानी मुलीला पालकांनीच दिली खुनाची धमकी…वाचा नेमके काय घडले

व्याजदर मोजण्याचे सर्वमान्य एकक म्हणून बीपीएसचा वापर केला जातो. सेंट्रल बँकेने १,१११ दिवसांच्या मुदत ठेवींसाठी ही योजना राबवली आहे. ही योजना मुदत ठेवींवरच लागू आहे.

या योजनेमुळे अधिकाधीक ज्येष्ठ नागरीक लसीकरण करून घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तज्ञांकडून वारंवार लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात असूनही काही नागरीकांचा लसीकरणाबाबत उत्साह दिसून येत नाही. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी राहते.

भारत सध्या लसोत्सव साजरा करत आहे. भारताने आत्तापर्यंत सुमारे १० कोटी ८५ लाख लोकांना लस दिली आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे.

Exit mobile version