स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने जानेवारी ते जून २०२२ च्या पहिल्या सहामाहीत २०० टक्के अधिक विक्री नोंदवली आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी नोंदवली गेली. या कालावधीत, कंपनीने भारतात एकूण ५२,६९८ वाहनांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २०० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने २०२२ च्या पहिल्या सहामाहीत १० विविध मॉडेल बाजारात आणले असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याचे स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पियूष अरोरा यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर संतोष बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं
१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मितालीने म्हणून केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
या कामगिरीवर भाष्य करताना, पीयूष अरोरा म्हणाले की, “आमच्या मजबूत अर्धवार्षिक विक्रीसह, आम्ही भारतात एक नवीन यशोगाथा लिहीत आहोत. या कालावधीत उत्पादनात १०० टक्के आणि निर्यातीत ३५% वाढ झाली आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही ही गती कायम ठेवू असे अरोरा म्हणाले.