‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…

‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…

अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयाने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या पॉवर युनिटच्या बाजूने एका केसचा निकाल दिला आहे. यामध्ये राजस्थानस्थित तीन सरकारी वितरण कंपन्यांना उर्वरित थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अदानी यांच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.

ह्या राजस्थानमधील कंपन्यांची अदानी पॉवरला ४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी देणे आहे. याशिवाय वाढीव इंधन खर्चाची भरपाई करण्यासाठी अतिरिक्त व्याज देखील या कंपन्या देणार आहेत.

या कंपन्यांना चार आठवड्यांत पैसे भरावे लागणार आहेत. अदानी पॉवरचा राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालू आहे. अदानी पॉवर कंपनीला त्यांच्या प्लांट्समध्ये वापरण्यासाठी महागड्या आयातित कोळशाचा अवलंब करावा लागतो आणि त्याची किंमत जास्त आहे. त्यामुळे कंपनी यासाठी नुकसान भरपाईची मागणी करत आहे. यासंदर्भात आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. चार वीज विक्रेत्यांना २०१३ पासूनची थकबाकी भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे अदानी पॉवरला कर्जाची परतफेड करण्यास किंवा प्रकल्पांसाठी भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची लवकरच सुटका

चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना अटक

‘मुख्यमंत्र्यांमध्ये धमक नसल्याने ते संजय राऊतांना पुढे करतात’

नवाब मालिकांची प्रकृती खालावल्याने केले रुग्णालयात दाखल…

या निर्णयानंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील अदानी पॉवरचे शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले आहेत, जे एका आठवड्यापेक्षा जास्त काळातील सर्वोच्च दर आहे. आज अदानी पॉवरचे शेअर्स १० टक्क्यांनी वाढून १२३.३० रुपयांनी व्यवहार केला आहे. यामुळे भविष्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version