अदानी समूहाचे शेअर्स कोसळले, पण शेअर मार्केटवर परिणाम नाही

गुंतवणूकदारांचे ५३ हजार कोटींचं नुकसान

अदानी समूहाचे शेअर्स कोसळले, पण शेअर मार्केटवर परिणाम नाही

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा परिणाम आठवड्याच्या पहिल्याचा दिवशी म्हणजेच सोमवारी अदानी समूहाच्या शेअर्सवर दिसून आला. आठवड्याच्या शेवटी हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालानंतर, सोमवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर्स सुरुवातीच्या सत्रात ७ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. अदानी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये माधबी पुरी बूच यांची गुंतवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या वृत्तांमुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आहेत. सकाळी ९.१५ वाजता बाजार उघडताच अदानी समूहाचे सर्व शेअर्स कोसळले. अदानी एनर्जी सोल्युशन्सने बीएसईवर सुमारे ७ टक्क्यांच्या घसरणीसह सुरुवात केली. शेअर बाजार उघडल्यानंतर काही सेकंदातच गुंतवणूकदारांचे ५३ हजार कोटींचं नुकसान झाले आहे. कारण, अदानींच्या १० कंपन्यांच्या शेअर्सचं एकत्रित बाजार भांडवल १६.७ लाख कोटींवर घसरले आहे. अदानीच्या बहुतांश शेअर्समध्ये ४ ते ६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे समूहाचे मार्केट कॅप १६ लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे.

अदानी समूहाचे कोणते शेअर्स घसरले?

सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी अदानी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्गने शनिवारी केला. त्यामुळे सेबी अदानी घोटाळ्यावर कारवाई करण्यास उत्सुक नसल्याचा दावाही करण्यात आला होता. हिंडेनबर्गच्या या आरोपांना निवदेनाद्वारे उत्तर देत बूच यांनी रविवारी आपली बाजू मांडली. अहवालात उल्लेख केलेल्या आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटने प्रवर्तन केलेल्या फंडामधील गुंतवणूक सिंगापूरस्थित खासगी नागरिक म्हणून केली होती आणि सेबीचे पूर्ण वेळ सदस्य होण्यापूर्वी दोन वर्षे आधी केली होती, असे माधबी आणि धवल बूच यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version