आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजरात तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवडाभरापासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येतं होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष आज शेअर बाजाराकडे लागले होते. मात्र, सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजार मोठ्या तेजीसह सुरू झाला.
आज, ११ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स ८४० अंकांच्या तेजीसह ६१ हजार ४५० वर सुरु झाला तर निफ्टी २४२ अंकांच्या तेजीसह १८ हजार २७५ वर सुरु झाला. आज सुरुवातीच्या सत्रात ४८ शेअर्समध्ये तेजी तर दोन शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
गुरवार, १० नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स-निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी लाल चिन्हांत बंद झाला. सेन्सेक्स ०.६९ टक्क्यांनी म्हणजेच ४१९.८५ घसरून ६० हजार ६१३.७० वर बंद झाला होता. त्याचवेळी निफ्टी ०.७१ टक्क्यांनी घसरून १८ हजार ०२८.२० बंद झाला होता. मात्र, आज सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजार मोठ्या तेजीसह सुरु झाला. नायका १५ टक्के, झोमॅटो १३ टक्के आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आजचे टॉप शेअर्स
- टाटा मोटर्स
- ऍक्सिस बँक
- महिन्द्रा अँड महिन्द्रा
- बजाज फिनसर्व्ह
- टायटन
- ऑरो फार्मा
- टीव्हीएस मोटर्स
- ए यू बँक
- बालक्रिष्ण इंडस्ट्रीज
- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड
हे ही वाचा:
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?
मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी
संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग
मुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!
दरम्यान, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले, संथ जागतिक संकेतांमुळे गुरुवारी बाजारात सावधता दिसून आल्याचे दिसले आहे. ऑटो आणि पीएसयू बँक शेअर्स प्रॉफीट बुकींग दिसून आली. आता जगभरातील गुंतवणूकदारांची नजर अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीकडे आहे.