गुंतवणूकदारांसाठी सोमवार जोरदार, शेअर बाजारात उसळी

बँकिंग आणि आयटी स्टॉकमध्ये तेजी

गुंतवणूकदारांसाठी सोमवार जोरदार, शेअर बाजारात उसळी

आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोमवार, २१ एप्रिल रोजी गुंतवणूकदारांसाठी चांगले चित्र दिसून आले. शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीने २४,००० अंकांचा टप्पा ओलांडला तर सेन्सेक्सने ७९,००० चा टप्पा पार केला. अनेक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत होता. शेअर बाजारही कधी तेजीत तर कधी गडगडताना दिसला. मात्र, सोमवारी गुंतवणूकदारांना चांगलाच दिलासा मिळाला.

सुरुवातीच्या सत्रात बँकिंग आणि आयटी स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. अ‍ॅक्सिस बँक, SBI, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली तर आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांपैकी टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, रिलायन्स इत्यादी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. दरम्यान, या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच ३.६० लाख कोटी रुपये कमावले. तर, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, एशियन पेंट्स आणि नेस्ले हे घसरले.

मिडकॅप कंपन्यांमध्ये, येस बँक शेअर, सुझलॉन शेअर, एयू बँक शेअर आणि पेटीएम शेअर वाढीसह व्यवहार करत होते. तर, स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये डेक्कन गोल्ड माइन्स, प्राइमो केमिकल्स, जस्टडायल, आयनॉक्सविंड शेअर, शिल्कटेक आणि सेन्को गोल्ड हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

हे ही वाचा..

संभलमध्ये फ्री गाझा, फ्री पॅलेस्टाईनचे पोस्टर्स नाचवले

“पोप फ्रान्सिस यांना करुणा, आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून लक्षात ठेवलं जाईल”

पोप फ्रान्सिस यांचे निधन

न्यायाधीशांना जाब विचारणारा इंदिरा गांधींचा जुना व्हीडिओ व्हायरल

विशेष म्हणजे ६ जानेवारी २०२५ नंतर निफ्टीने पहिल्यांदाच २४,००० अंकांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे शेअर बाजारात सोमवार हा शुभ ठरला. सकाळी बाजार सुरु झाला तेव्हाच भारतीय शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतल्याने गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला. ट्रेडिंग दिवशी, गेल्या आठवड्याच्या गुरुवारी, सेन्सेक्स निफ्टी देखील चांगल्या वाढीसह बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स १५०९ अंकांनी वाढून ७८,५५३ वर बंद झाला आणि एनएसई निफ्टी ४१४ अंकांनी वाढून २३,८५१ वर बंद झाला. गेल्या आठवड्यातील तीन व्यापारी दिवसांत, बीएसई सेन्सेक्समध्ये ३,३९५.९४ अंकांनी किंवा ४.५१% वाढ झाली, तर एनएसई निफ्टीमध्ये १०२३.१० अंकांनी किंवा ४.४८% वाढ झाली.

आम्ही म्हणतो ते करा, मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरा ! | Mahesh Vichare | Tanisha Bhise | Amit Gorkhe |

Exit mobile version