शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण

आजच्या दिवशी शेअर बाजारात चढ-उतार पहायला मिळाले. आजच्या दिवसाची सुरूवात होताना बाजारात तेजी होती, परंतु नंतर मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी हात आखडता घेतल्याचे दिसत आहे.

आजच्या दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. निफ्टी साधारणपणे १४,५५० वर बंद झाला तर सेन्सेक्स साधारणपणे ४९,२५० वर बंद झाला. त्यामुळे सेन्सेक्समध्ये ५८५ अंकांची घट झाली, तर निफ्टीमध्ये १६३ अंकांची घट नोंदली गेली.

आजच्या दिवसात आयटी, बँक, फायनान्शियल आणि ऑटो सेक्टर मध्ये विशेष गुंतवणुक आढळली नाही. परंतु निफ्टीमध्ये एफएमसीजी आणि धातु उद्योगात मात्र चांगली गुंतवणुक आढळून आली. आयटीसी, बजाज ऑटो, एम ॲंड एम, मारूती, एअरटेल आणि ओएनजीसी आजचे टॉप गेनर्स राहिले तर एचसीएल टेक, इन्फोसिस टॉप, डॉ. रेड्डीज, टीसीएस, आरआयसीएल, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि कोटक बँक लूजर्स राहिले आहेत.

हे ही वाचा:

लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी

सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून वाचवा, अन्यथा त्यांचा मनसुख हिरेन होईल

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

आज एकंदरितच आशियाई बाजारात तेजी आढळली. सेन्सेक्स ३० च्या २१ शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, तर ९ शेअर्स तेजीत राहिले.

Exit mobile version