लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण आणि सरकारकडून सातत्याने देण्यात येणारी लॉकडाऊनची धमकी, याचा परिणाम आज बाजारावर बघायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)मध्ये सेन्सेक्स सुमारे १७०० अंकांनी कोसळला.

काल देशभरात सुमारे १,६८,९१२ रुग्णांची नोंद झाली. अनेक देशांप्रमाणे भारतालासुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे.

हे ही वाचा:

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मृत्युनंतरही रुग्णांचे हाल सुरूच

भाजपाचे माजी आमदार पास्कल धानारे यांचे कोरोनामुळे निधन

वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबरोबरच आशियातील थंड पडत चाललेल्या व्यापाराचा देखील फटका बाजाराला बसला आहे.

आज सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४७,८३४.८४ या अंकांवर होता. हा आकडा आदल्या दिवशी सेन्सेक्स ४९,५९१.३२ या बंद झालेल्या आकड्यापेक्षा १,७५६.४८ अंकांनी किंवा ३.५४ टक्क्यांनी कमी आहे. आज उघडतानाच सेन्सेक्स ४८,९५६.६५ वर चालू झाला आणि हाच इन्ट्राडेमध्ये सर्वाधिक अंक राहिला, तर पडझड होऊन सर्वात कमी ४७,८१३.६० या अंकांवर आला होता, जा अजूनपर्यंतचा आजच्या दिवसातला सर्वात कमी आकडा आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील पडझड पहायला मिळाली. निफ्टी५० ज्याचा व्यवहार १४,३०४.०० अंकांवर होत होता त्यात ५३०.८५ अंकांची किंवा ३.५८ टक्क्यांची पडझड त्याच्या आधी बंद झालेल्या आकड्याच्या तुलनेत झाली. या बरोबरच बीएसई रिअल्टी, बीएसई बँकेक्स, बीएसई मेटल यांच्यात देखील ५ टक्क्यांची पडझड नोंदली गेली.

Exit mobile version