उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर सेबीचे कठोर निर्बंध…

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर सेबीचे कठोर निर्बंध…

बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि त्यांचे मालक उद्योगपती अनिल अंबानी यांना सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. कंपनीशी संबंधित कथित फसवणुकीच्या कृत्यांबद्दल शिक्षा म्हणून सेबीने हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय, आणखी तीन जणांवरही सेबीने कडकपणा दाखवत त्यांना शेअर बाजारातून बंदी घातली आहे. यामध्ये अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश आर शहा हे आहेत. कंपनीशी संबंधित कथित फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

अनिल अंबानी आणि इतरांना पुढील आदेशापर्यंत सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थाशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीशी किंवा सार्वजनिक कंपनीचे संचालक म्हणून काम करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे असे सेबीने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. सेबी ने हे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला प्राप्त झालेल्या काही तक्रारी ज्यात कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाद्वारे पैसे काढणे, वळवणे आणि बँकांकडून अनेक फसवणूक मॉनिटरिंग रिटर्न्स प्राप्त केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?

बायडन-पुतीन यांच्यात फोनवरून होणार ‘युक्रेन पे चर्चा’

एकनाथ आव्हाडांचे ‘शब्दांची नवलाई’ बालकवी पुरस्कारने सन्मानित

ठाकरे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे अडचणीत

रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरची स्थिती ही बातमी येण्याआधीच खालावली झाली होती आणि शेअरची किंमत पाच रुपयांपेक्षा कमी झाली होती. अनिल अंबानी यांच्या कंपनीचा शेअर शुक्रवारी बाजार बंद होताना दीड टक्क्यांनी घसरला होता. आता सिक्युरिटी मार्केटवर बंदी घातल्यानंतर या कंपनीच्या उर्वरित भागधारकांसाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून अनिल अंबानींच्या कंपन्यांबाबत केवळ चिंताजनक बातम्या येत आहेत. आता सेबीने अनिल अंबानींबाबत नुकतीच केलेली कठोरता त्यांच्या अडचणीत वाढ करणार आहे.

Exit mobile version