मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल आणि किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपमधील २४,७१३ कोटी रुपयांच्या करारामध्ये मुकेश अंबानींना मोठा धक्का बसला आहे. या कराराची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. सर्वोच्च न्यायालयाने अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. सीएनबीसी टीव्ही १८ च्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की आपत्कालीन लवाद निर्णय लागू करण्यायोग्य आहे. आपत्कालीन लवादने फ्युचर रिटेल डीलवर स्थगिती आदेश जारी केला होता.
SC rules in favour of Amazon, says Singapore's Emergency Arbitrator award against FRL-Reliance Retail merger enforceable here
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2021
रिलायन्स रिटेलसोबत फ्युचर रिटेलचा ३.४ बिलियनचा करार आपत्कालीन लवाद निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पात्र आहे, असंही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेय. लवाद या करारावर स्थगिती आदेश जारी केला होता, ज्या अंतर्गत फ्युचर रिटेलने आपला संपूर्ण व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकला होता. ऍमेझॉन रिलायन्स आणि फ्युचर कराराला विरोध केला होता आणि त्यावर स्थगितीची विनंती केली होती.
हे ही वाचा:
राज्यात फक्त काय’द्यायचे’ राज्य आहे का?
सलग सातव्यांदा आरबीआयकडून रेपोरेटे जैसे थे
बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता
ही बातमी समोर आल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सकाळी ११ वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर १.७९ टक्के (३८.३० रुपये) घसरून २०९५.९५ रुपयांच्या पातळीवर आला. रिलायन्सच्या घसरणीमुळे बाजारातही घसरण दिसून येत आहे. यावेळी सेन्सेक्स १५७ अंकांच्या घसरणीसह ५४३३५ च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि निफ्टी २२ अंकांनी १६२७२ च्या पातळीवर घसरला होता. सेन्सेक्समध्ये सध्या रिलायन्सला मोठा तोटा सहन करावा लागतोय.