… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद

… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद

देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) बँकेच्या खातेदारांसाठी व्यवहार करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार बँक संबंधित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आवाहन बँकेने केले आहे. बॅंकेच्या काही महत्त्वाच्या सेवा आज (११ डिसेंबर) बंद राहणार आहेत.

बँकेच्या ४४ कोटी खातेधारकांसाठी एसबीआयने ही माहिती दिली असून एसबीआय इंटरनेट बॅंकिंग सेवा शनिवारी- रविवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ग्राहकांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी ११ डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी बॅंकेशी निगडीत ऑनलाइन कामे पूर्ण करावीत, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने

सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास

सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी

‘आदित्य’ सूर्यावर जाणारच!

एसबीआय बँक तंत्रज्ञान अपग्रेडेशन करत असल्याने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ग्राहकांना ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण बँकेकडून देण्यात आले आहे. देशभरात एसबीआयचे मोठे नेटवर्क आहे. या बॅंकेच्या ऑनलाइन सुविधांचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे या सेवा बंदीच्या वेळात ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये INB, Yono, Yono Lite, Yono Business आणि UPI चा समावेश आहे. या सुविधा ३०० मिनिटांच्या कालावधीसाठी बंद राहणार आहेत.

Exit mobile version