29 C
Mumbai
Sunday, January 12, 2025
घरअर्थजगतशक्तीकांत दास निवृत्त होणार, हे आहेत रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

शक्तीकांत दास निवृत्त होणार, हे आहेत रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपणार

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत असल्यामुळे केंद्र सरकाककडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संजय मल्होत्रा हे पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत आणि पुढील तीन वर्ष ते या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

आरबीआयचे आताचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. यानंतर दास यांचा कार्यकाळ आणखी वाढवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात असताना आता केंद्र सरकारने या पदासाठी नवनियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून सध्या महसूल सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची नियुक्ती गव्हर्नरपदी करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

‘हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत चिंतेत’

तुम्ही आमच्यावर कब्जा कराल तर आम्ही लॉलीपॉप खात बसू का?

१०३ शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलं… राज ठाकरे वक्फ बोर्डाविरोधात

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणार का?

संजय मल्होत्रा हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत. मल्होत्रा हे पुढील तीन वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. संजय मल्होत्रा हे १९९० बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली असून प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा हे REC लिमिटेड या सरकारी कंपनीचे अध्यक्ष आणि एमडीही राहिले आहेत. त्यांनी वीज, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम अशा अनेक क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी राजस्थानमध्ये ऊर्जा विभागाचे प्रभारी प्रधान सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांनी वित्तीय सेवा विभागात सचिवपदही भूषवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा