अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात लिथियम आयन बॅटरीवरील सीमा शुल्क २.५ टक्क्यांनी कमी करून १३ टक्क्यांवर आणल्याने आगामी काळात स्मार्टफोन स्वस्त होणार आहेत. पण त्याच वेळी आणखी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्ट मोबाईल उत्पादनात आघाडीवर असलेल्या कोरियातील सॅमसंग कंपनी भारतामध्ये स्मार्ट फोनचे उत्पादन करण्याचा विचार करत आहे. याच आठवड्यात कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस २३ सिरीज भारतात आणली. या मालिकेमध्ये गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रा आणि गॅलॅक्सी एस २३ प्लस मोबाईल भारतात आणण्यात आले आहेत.
सध्या,गॅलॅक्सी एस मालिकेतील स्मार्टफोन सॅमसंगच्या व्हिएतनाम कारखान्यात तयार केले जातात आणि कंपनी ते भारतात विक्रीसाठी आयात करते. भारतात विकले जाणारे सर्व गॅलॅक्सी एस २३ स्मार्टफोनचे उत्पादन कंपनीच्या नोएडातील कारखान्यात केले जाईल.
हे ही वाचा:
३० तासाच्या शोधानंतर कोल्हापूर सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेले मुंबईत
योगी आदित्यनाथ सर्वोत्तम मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती
मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी
सॅमसंग आधीच भारतातील बहुतांश देशांतर्गत मागणी नोएडा कारखान्यात स्थानिक उत्पादनाद्वारे पूर्ण करते. सॅमसंगचा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन विक्री करण्याचा विचार असल्याचे सॅमसंगने एका निवेदनात म्हटले आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या उद्देशाने सॅमसंगने २०१८ मध्ये नोएडा येथे जगातील सर्वात मोठ्या मोबाइल फोनचे उत्पादन सुरु केले होते. उद्घाटन केले. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले .
फोनची किंमत कमी होऊ शकते
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅमेरा लेन्सच्या आयातीवरील शुल्क हटवण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने हे विधान केले आहे. त्यामुळे सॅमसंग फोनच्या किमती कमी होऊ शकतात. गॅलेक्सी एस सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा हे प्रमुख फिचर्स आहे. कंपनीने गॅलॅक्सी एस २३ स्मार्टफोनचे तीन मॉडेल सादर केले, जे हाय-एंड कॅमेरा सेन्सर्ससह येतात. गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रा २०० एमपी कॅमेऱ्यासह येतो. यामध्ये नवीन २००-मेगापिक्सेल अॅडॉप्टिव्ह पिक्सेल सेन्सर देण्यात आला आहे जो उत्तम फोटो कॅप्चर करतो.” हा फोन पाच कॅमेरा सेन्सरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये १२ मेगापिक्सेल ते २०० मेगापिक्सेलच्या रेंजमध्ये कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहेत.