23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतरशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला....

रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….

Google News Follow

Related

रशिया आणि युक्रेनमधील संकट अधिक गडद झाल्यामुळे आज जगभरातील शेअर बाजार कोसळला आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीच शेअर बाजार उघडताच गोंधळ उडाला आहे. बीएसई सेन्सेक्स आज एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी जवळपास तीनशे अंकांनी घसरला आहे.

आज बाजार उघडल्यानंतर तब्बल २५४ शेअर्स वधारले तर १ हजार ९३२ शेअर्स घसरले आहे. दरम्यान, सेन्सेक्समधील सर्व तीस समभाग लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. डॉ रेड्डीज लॅब्स, एल अँड टी, एशियन पेंट्स, टीसीएस आणि यूपीएल हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात आहेत, तर फक्त ओएनजीसी चा समभाग नफ्यामध्ये आहे.

केवळ भारतातच नाही, तर रशिया-युक्रेनमधील गंभीर संकटाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. आशियापासून युरोपपर्यंतच्या बाजारपेठेत मोठी घसरण झाली आहे. आज भारतीय शेअर बाजारातच गोंधळ उधळा नसून, तर युरोप बाजाराचीही हीच स्तिथी आहे. युरोपीय एटीएसई ०.३९ टक्के, सीएसी २.०४ टक्के आणि डॅक्स २.०७ टक्क्यांनी घसरले आहेत. आणि आशियाई बाजार, SGX निफ्टी एक टक्‍क्‍यांनी आणि हँग सेंग ३.२३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे.

हे ही वाचा:

हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

भारताच्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने विश्वविजेत्या कार्लसनला नमवले

मध्य प्रदेशात २०२३ला काँग्रेसची ठरणार का शेवटची निवडणूक?

मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव, अमेरिकेतील महागाई आणि वाढणारे व्याजदर आदी कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्स विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. त्याच्या परिणामी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. काल सेन्सेक्स १४९ अंकांनी घसरून ५७ हजार ६८३ वर बंद झाला, तर निफ्टी देखील ७०अंकांनी घसरून १७ हजार २०६ वर बंद झाला होता.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा