नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एन.सी.आर.टी.सी) या कंपनीने देशातील पहिल्या खडी विरहीत रेल्वेमार्गाची उभारणी केली आहे. रीजनल रॅपिड ट्रान्जिट सिस्टीम (आर.आर.टी.एस) या नावाने ओळखली जाणाऱ्या या रेल्वे मार्गाची १८० कि.मी/ प्रतितास या वेगाने वाहतूक करण्याची क्षमता आहे. या मार्गाच्या दुरूस्तीचा खर्च अतिशय कमी आहे. एका एन.सी.आर.टी.सीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार देशात अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही.
दिल्ली-गाज़ियाबाद-मेरठ या मार्गावरील साहिबाबाद-दुहाई या १७ कि.मी लांबीच्या अधिक प्राधान्य असलेल्या भागासाठी वापरण्यात येणार आहेत. या भागाचे संचलन २०२३ पासून सुरू होईल, तर संपूर्ण ८२ कि.मी लांबीचा मार्ग २०२५ मध्ये कार्यान्वित होईल.
भारतातील पहिला आर.आर.टी.एस मार्ग दिल्ली ते मेरठ असा असून तो गाज़ियाबाद, दुहाई आणि मोदी नगर मार्गे जाईल. यामुळे सध्या रस्त्यावरून दिल्ली-मेरठ अंतर केवळ तासाभराच्या वेळेत कापले जाईल. सध्या रस्त्यावरून हे अंतर कापायला तीन-चार तास लागतात.
एन.सी.आर.टी.सी कडून मिळालेल्या माहितीनुसार या मार्गिकेसाठी वापरायच्या ट्रॅक स्लॅब कास्टिंग यार्ड शताब्दी नगर येथे उभारले जात असून ते १८० दिवसात पूर्ण होईल.
या कास्टिंग यार्डातून १७ कि.मी लांबीच्या प्राधान्य मार्गीकेसाठी लागणाऱ्या ट्रॅकचे उत्पादन होईल. या मार्गवर साहिबाबाद, गाज़ियाबाद, गुलधार आणि दुहाई ही चार स्थानके असतील.
आर.आर.टी.एस मार्गिका मेट्रो स्थानके, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांना संंलग्न असतील. त्यामुळे प्रवास सुखकारक होईल.