सेन्सेक्समध्ये आज उसळी

सेन्सेक्समध्ये आज उसळी

आज संपूर्ण दिवसभराच्या उलाढालीनंतर दिवसाच्या सुरूवातीला असलेले सेन्सेक्सचे अंक आणि बंद होतानाचे आकडे यात चांगली तफावत आढळली. आज बंद होता सेन्सेक्स चढून बंद झालेला होता.

आजच्या दिवसाची सुरूवात होताना सेन्सेक्स ४७.२०४ वर होता. त्यानंतर दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स चढून ४८,१४३ अंकांवर बंद झाला. आजच्या दिवसभरात आर्थिक क्षेत्र आणि धातू क्षेत्रात उत्साह आढळून आला.

हे ही वाचा:

शिवसेना नेत्यानेच केले ठाकरे सरकारला लक्ष्य

ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमला दाखल

फायझरची लस भारतात ‘ना नफा’ तत्वावर मिळणार

बिहारमध्ये हिंदू पुजाऱ्यांची निर्घृण हत्या

आज बंद होण्यापूर्वी बीएसईमधील सेन्सेक्स ४८,०८१ वर स्थिरावला होता, परंतू बंद होण्यापूर्वी त्यात ३७५ अंकांची उसळण नोंदली गेली. त्याप्रमाणेच निफ्टी५० मध्ये देखील २५५ अंकांची उसळी घेतली गेली आणि बंद होता निफ्टी५० १४,४०६ वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ कंपन्या चढ्या दरावर स्थिरावल्या तर निफ्टी५०च्या ५० पैकी २७ कंपन्यादेखील चढ्या दरावर स्थिरावल्या होत्या. निफ्टी५० च्या विप्रो, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्पु स्टील, टाटा स्टील, एचडीएफसी, बजाज ऑटो, बीपीसीएल या कंपन्या निफ्टीमध्ये वरच्या क्रमांकावर पहायला मिळाल्या. सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक आणि एसबीआय यांनी सेन्सेक्समध्ये बाजी मारली होती.

या कंपन्या चढ्या दरावर स्थिरावल्या तर श्री सिमेंट, टायटन, टाटा कन्स्युमर प्रोडक्ट, एचयुएल, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्या आज कोसळत्या राहिल्या.

Exit mobile version