25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरअर्थजगतमुंबईतील सदनिकांच्या विक्रीत मोठी वाढ

मुंबईतील सदनिकांच्या विक्रीत मोठी वाढ

Google News Follow

Related

एका अहवालानुसार स्टँप ड्युटीमध्ये केलेल्या कपातीमुळे आणि मागणीत वाढ झाल्यामुळे मुंबईतील घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. घरांच्या एकूण विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये २३४ टक्क्यांची वाढ नोंदली गेल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये एकूण ३,७९८ घरांची विक्री झाली होती, तर मार्च २०२१ मध्ये १२,६९६ घरांची विक्री झाल्याचं नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

व्हेनेझुएला लसीच्या बदल्यात देणार तेल

इस्रोकडून हरित इंधन निर्मीतीचे प्रयत्न वेगात सुरू

या अहवालानुसार महामारीच्या अनुभवामुळे घरांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ६७,८६३ घरांची विक्री झालेली तर २०२० मध्ये ६५.२७२ घरांच्या विक्रीची नोंदणी झाली होती.

जानेवारी ते २४ मार्च २०२१ पर्यंत विकल्या गेलेल्या घरांची एकूम किंमत ₹३९,८८० कोटी होती. सप्टेंबर २०२० पासून स्टँप ड्युटीच्या दरात घट करण्यात आल्याने आत्तापर्यंत एकूण ₹१,०८,९६७ कोटी किंमतीच्या सदनिका विकल्या गेल्या.

संपूर्ण २०२० मध्ये ₹१,००,२४५ कोटींच्या सदनिकांचा व्यवहार झाला होता. याऊलट २०१९ मध्ये ₹९०,७६९ कोटींच्या विक्रमी व्यवहारापेक्षा वरचढ ठरला.

नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार “स्टँप ड्युटीमध्ये केलेल्या कपातीचा दीर्घकाळ अडकलेल्या गृहनिर्माण क्षेत्राला फायदा झाला. आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत मोठीच वाढ झाली, आणि नंतर स्टँप ड्युटीत थोडी वाढ केल्यावरी खरेदीदारांचा उत्साह अजूनही टिकलेला दिसून येत आहे.”

घरांच्या घसरलेल्या किंमती, गृहकर्जाचे घटलेले दर, आणि गृह विकासकांकडून देण्यात आलेल्या विविध सोयी सवलती यांमुळे रहिवासी सदनिकांच्या विक्रीत मोठी वाढ झालेली दिसून आली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बैजल यांनी असेही सांगितले की, अनेक वर्षांच्या मंदीनंतर गृहनिर्माण क्षेत्रात तेजी दिसून आली. मुंबई पुन्हा एकदा आपल्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षण असल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले की, सरकरारने जर स्टँप ड्युटी अजून काही काळासाठी कमी ठेवली तर त्याचा मोठा फायदा या क्षेत्राला आपल्या पायावर उभे राहायला होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा