रिलायन्स रिटेल लवकरच ताब्यात घेणार ‘ही’ फास्ट फूड कंपनी

रिलायन्स रिटेल लवकरच ताब्यात घेणार ‘ही’ फास्ट फूड कंपनी

रिलायन्स उद्योग समुह येत्या काही काळात भारतातील एक मोठा खाद्यउद्योग विकत घेणार आहे. सुमारे १४८८-१८६० कोटी रुपयांना हा सौदा होणार आहे.

रिलायन्स येत्या काही काळात सबवेची भारतीय नोंदणी असलेली कंपनी खरेदी करणार आहे. जॉन चिडसी यांच्या नेतृत्वाखालील सबवे या कंपनीमध्ये सध्या काही मोठे रचनात्मक बदल केले जात आहेत. सध्याच्या काळात कंपनीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कंपनी कर्मचारी कपात करण्याच्या विचारात असल्याचे देखील बोलले जात आहे.

सध्याची पद्धत बदलण्यासाठी सबवेला देशांतर्गत पातळीवरील भागीदारीचा शोध होता. सबवे सध्या अस्तित्वात असलेल्या वैयक्तिक शाखांच्या पद्धतीऐवजी दुसऱ्या मार्गाच्या शोधात आहे.

हे ही वाचा:

…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक

अनिल देशमुख यांची पुन्हा हुलकावणी

‘कोनशिलेवर मुख्यमंत्र्यांचे नाव, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का नाही?’

१५ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री भेटले नाहीत तर ‘मातोश्री’ समोर आत्मदहन

सध्याच्या काळात काही एजन्टच्या मार्फत फ्रान्चायज चालू केली जाते. यामध्ये हे एजन्ट शाखेच्या जागेचे मालक नसले तरीही, त्यांचा हस्तक्षेप त्या शाखांच्या संचलनामध्ये असतो. सबवेची मूळ पालक संस्थेच्या मालकीची सध्या एकही शाखा नाही. त्याऐवजी ते प्रत्येक शाखेकडून ८ टक्के मूल्य वसूल करून घेतात.

जर रिलायन्ससोबतची बोलणी यशस्वी झाली, तर रिलायन्स समूह ६०० पेक्षा अधिक शाखा असलेला सबवे समुह ताब्यात घेईल.

Exit mobile version