27 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरअर्थजगतरिलायन्स जिओची चार शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू

रिलायन्स जिओची चार शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू

जिओने युझर्ससाठी ५ जी वेलकम ऑफर देखील जाहीर केली आहे

Google News Follow

Related

रिलायन्स जिओची ५ जी सेवा चार शहरांमध्ये सुरू झाली आहे. हि ५ जी सेवा दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि वाराणसीसह चार शहरांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय जिओने युझर्ससाठी ५ जी वेलकम ऑफर देखील जाहीर केली आहे आणि आमंत्रित युझर्सना Jio True 5G सेवांची चाचणी घेता येईल. जिओ ऑफरचा विस्तार आमंत्रणाद्वारे केला जाईल आणि नेटवर्क विस्तारत असताना इतर शहरांसाठी बीटा चाचणी सेवा जाहीर केली जाईल, अस जिओने म्हटलं आहे

जिओ ने ‘Jio True 5G वेलकम ऑफर’ द्वारे अमर्यादित डेटा तसेच १,००० एमबीपीएसपर्यंत जाण्याचा वेग देण्याचे वचन दिले आहे.ट्रू-5जी सेवेची बीटा चाचणी दसऱ्यापासून सुरू झाली आहे. मात्र, ते अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही. सध्या देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. काही काळानंतर ते हळूहळू देशभरात सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या, देशातील निवडक शहरांमधील काही जिओ वापरकर्ते ५ जी सेवेत प्रवेश करू शकतात. या अंतर्गत, केवळ तेच वापरकर्ते सेवा वापरू शकतात, ज्यांना त्यासाठी आमंत्रण पाठवले जाईल. जर तुम्हाला यासाठी आमंत्रण मिळाले तरच या सेवेचा लाभ घेता येऊ शकणार आहे.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

रिलायन्स जिओपूर्वी ५ जी सेवा सुरू करणारी एअरटेल देशातील पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने १ ऑक्टोबरपासून देशातील टॉप आठ शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी आणि कोलकाता यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये रोलआउटसोबतच लोकांच्या फोनमध्ये ५ जी सिग्नलही येत आहेत.

देशात ५ जी सेवा आल्यानंतर ग्राहकांना कॉल आणि कनेक्टिव्हिटीची चांगली सुविधा मिळेल. इंटरनेट वापरकर्ते चित्रपट आणि इतर गोष्टी एका चुटकीसरशी डाउनलोड करू शकतील. टीव्ही कार्यक्रम, मल्टीमीडिया इत्यादी उच्च दर्जात पाहण्यास सक्षम असतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा