१०० अब्ज डॉलर कमावणारी रिलायन्स पहिली भारतीय कंपनी

१०० अब्ज डॉलर कमावणारी रिलायन्स पहिली भारतीय कंपनी

भारतीय प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आर्थिक क्षेत्रात मोठा टप्पा गाठला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी १०० अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. शेअर बाजाराला रिलायन्सकडून पाठवण्यात आलेल्या अहवालात रिलायन्सने ही आकडेवारी दिली आहे. तेल शुद्धीकरण मार्जिन, दूरसंचार आणि डिजिटल सेवांमध्ये सातत्याने झालेली वाढ आणि किरकोळ व्यवसायातील चांगली गती यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, असे रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत २२.५ टक्के एकत्रित निव्वळ नफा १६ हजार २०३ कोटी रुपये कमावला आहे. तर अलिकडेच रिलायन्सने बाजार भांडवलात १९ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत रिलायन्सला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की, तेल शुद्धीकरण मार्जिन, दूरसंचार आणि डिजिटल सेवांमध्ये सातत्याने झालेली वाढ आणि किरकोळ व्यवसायातील चांगली गती यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणीचे संकट

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी

महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई

तेल ते दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला २०२०- २१ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी- मार्च तिमाहीत १३ हजार २२७ कोटी रुपयांचा एकुण निव्वळ नफा झाला. तसेच रिलायन्सच्या उत्पनांतही मोठी वाढ झाली असून उत्पन्न वाढून ७.९२ लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज ही वार्षिक १०० अब्ज डॉलर उत्पन्न मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

Exit mobile version