रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिची दूरसंचार कंपनी जिओ इन्फोकॉमने ५ अब्ज डॉलरचे परकीय चलन कर्ज उभारले आहे . विशेष म्हणजे भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील बँक आणि वित्तीय समूहाकडून घेतलेले हे सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज म्हटले जात आहे. गेल्याच आठवड्यात रिलायन्सने ५५ बँकांकडून ३ अब्ज डॉलरचा निधी उभारला होता. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने १८ बँकांकडून अतिरिक्त २ अब्ज डॉलरची रक्कम उभारली आहे.३१ मार्चपर्यंत तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्यात आले होते, तर या आठवड्यात मंगळवारी दोन अब्ज डॉलर्स जमा झाले आहेत.
या निधीचा विनियोग रिलायन्स जिओ भांडवली खर्चासाठी आणि जिओ ही रक्कम देशभरात ५जी नेटवर्क सुरू करण्यासाठी खर्च करणार आहे. रिलायन्सने सुमारे दोन डझन तैवानच्या बँकांसह, तसेच बँक ऑफ अमेरिका,एचएसबीसी , एमयूएफजी , सिटी , एसएमबीसी , मिझुहो आणि क्रेडिट ऍग्रिकोल या जागतिक बँकांसह ५५ सावकारांकडून ३ अब्ज अब्ज डॉलरचे कर्ज प्रामुख्याने उभारले होते असे सूत्रांनी सांगितले. प्राथमिक कर्जाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा:
धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात
अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!
सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…
मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉमने परदेशी चलनात दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज उभारले आहे. हे कर्ज परकीय चलन सुविधेअंतर्गत सर्वाधिक स्पर्धात्मक दराने उभारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने यापूर्वी देशातील सर्वात मोठ्या सिंडिकेटेड कर्जाअंतर्गत ३ अब्ज डॉलरचा निधी उभारण्यासाठी करार केला होता. हा वित्तपुरवठा ३१ मार्च रोजी पूर्ण झाला. त्यानंतर २ अब्ज डॉलर अब्ज जमा झाले असल्याचे या कराराशी परिचित असलेल्या बँकिंग सूत्रांनी सांगितले