मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकन कंपनी रेव्हलॉन कंपनीचे अधिग्रहण करण्याचा विचार करत आहे.अमेरिकेतील सौंदर्य प्रसाधने बनवणारी दिग्गज कंपनी रेव्हलॉन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रेव्हलॉनने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. त्यानुसार मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने रेव्हलॉन खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे.
रेव्हलॉन कंपनीवर प्रचंड कर्ज आहे. मार्च तिमाहीच्या अखेरीस या कंपनीवर ३.३१ अब्ज डॉलर कर्ज होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे आणि लोक पुन्हा घराबाहेर पडल्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत जगभरात सौंदर्यप्रसाधनांची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. मात्र रेव्हलॉनला अनेक डिजिटल स्टार्टअप ब्रँडकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, कंपनीने मार्चमध्ये सांगितले होते की पुरवठा करण्यासाठी कंपनीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि यामुळे ते ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नाही.
हे ही वाचा:
गौतम अदानींचा कंठ दाटून का आला?
मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली
पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!
लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी
सुरुवातीच्या काळात ही कंपनी नेलपॉलिशचा व्यवसाय करत होती .पण १९५५ मध्ये कंपनीने लिपस्टिक व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. कोविड 19 मुळे कंपनीच्या पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला होता. लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले, त्यामुळे लिपस्टिकसारख्या वस्तूंचा वापर कमी झाला. त्यामुळे कंपनीच्या महसुलावर विपरीत परिणाम झाला.