आर्थिक वर्ष २०२२-२३ ची दुसरी तिमाही आजपासून सुरु झाली. तसेच महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरचे नवीन दर सादर केले जातात. त्याप्रमाणे शुक्रवार, १ जुलै रोजी म्हणजेच आज एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर झाले आहेत. सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आला आहे. दिल्लीत इंडेन सिलेंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कोलकातामध्ये १८२ रुपयांनी, मुंबईत १९०.५० रुपयांनी, तर चेन्नईमध्ये १८७ रुपयांनी कमी झाले आहेत. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे.
जूनमध्ये इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते. पण घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. १४ किलोचा घरगुती सिलिंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. त्याचा दर आजही १९ मे रोजीच्या दराने उपलब्ध आहेत. दिल्ली आणि मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा भाव १ हजार ३ रुपये आहे. तर पुण्यात १ हजार ६ रुपये, जयपूरमध्ये १ हजार ७ रुपये, चेन्नईमध्ये १ हजार १९ रुपये, कोलकतामध्ये १ हजार २९ रुपये, लखनौमध्ये १ हजार ४१ रुपये आहे. तर एलपीजी सिलेंडरचा सर्वात जास्त दर १ हजार ९३ रुपये पाटणामध्ये आहे.
हे ही वाचा:
मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी
संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार
सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!
मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पहिल्या बारा घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली आहे. तसेच केंद्राने केंद्रीय उत्पादन शुल्क पेट्रोलवरील प्रति लिटर आठ रुपये आणि डिझेलवरील प्रति लिटर सहा रुपये कमी केला आहे