जीएसटीचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न गोळा

जीएसटीचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न गोळा

गुड्स अँड सर्विसेस टॅक्सच्या रुपाने मार्च २०२१ मध्ये एकूण १ लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयाचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

जीएसटी महसूल प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर मार्च २०२१ मध्ये गोळा झालेली रक्कम ही आजवरची सर्वाधिक रक्कम ठरली आहे. मागील पाच महिन्यांपासून जीएसटीमधून गोळा होणारी रक्कम वाढती राहिली आहे. मार्च २०२१ मधील हे उत्पन्न गेल्यावर्षीच्या याच महिन्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत २७ टक्के जास्त आहे.

हे ही वाचा:

मुंबईत दोन शिफ्टमध्ये लसीकरण

गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

पंतप्रधानांनी केली रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी

या महिन्याच्या कालावधीत गोळा झालेल्या एकूण महसूलापैकी ७० टक्के महसूल आयात करण्यात आलेल्या वस्तूंमार्फत मिळाला होता. तर देशांतर्गत सेवा आणि वस्तूंमधून निर्माण झालेला महसूल हा याच महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी जास्त राहिला आहे.

गोळा झालेल्या घसघशीत एकूण रकमेपैकी ₹२२,८७३ कोटी सीजीएसटीच्या अंतर्गत येतो तर एसजीएसटीच्या अंतर्गत ₹२९,३२९ कोटी एवढी रक्कम येते. त्याशिवाय सर्वात जास्त ₹६२,८४२ कोटी रक्कम आयजीएसटी अंतर्गत गोळा झाली आहे. त्याव्यतिरिक्त ₹८,७५७ कोटींचा सेस देखील सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. यात आयात केलेल्या वस्तुंवरील ₹९३५ कोटींचा देखील समावेश होतो.

केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जीएसटी उत्पन्न गेल्या सहा महिन्यांपासून वाढते राहिले आहे. त्याबरोबरच हे उत्पन्न एक लाख कोटींच्या वर जाणे हे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण आहे. त्याबरोबरच नकली बिलांच्या विरोधात केलेली कारवाई, अनेक प्रकारचा सातत्याने गोळा केलेला डेटा, आयकर विभागातील आणि कस्टम्स विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता इत्यादींचा एकत्रित परिणाम म्हणून जीएसटी उत्पन्नात वाढ झाली आहे.

Exit mobile version