कोविडच्या दुसऱ्या लाटेतही अर्थव्यवस्थेची तब्ब्येत सुधारती

कोविडच्या दुसऱ्या लाटेतही अर्थव्यवस्थेची तब्ब्येत सुधारती

भारत सध्या जरी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असला तरीही भारताचे जीएसटी उत्पन्न विक्रमी राहिले आहे. एप्रिल महिन्यात देखील जीएसटीचे उत्पन्न गगनचुंबी असल्याचे समजले आहे.

सलग सातव्या महिन्यात जीएसटीने एक लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा पार केला असून सरकारसाठी दिलासादायक बाब आहे. वस्तू आणि सेवा करातून सरकारला एप्रिल महिन्यात १,४१,३८४ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था करोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०१७ मध्ये अंमलात आल्यानंतर एका महिन्यातील ‘जीएसटी’चे हे विक्रमी उत्पन्न आहे.

हे ही वाचा:

पण काही बाटगे मात्र विदेशी राज्यकर्त्यांसमोर मुजरा करीत राहिले

सिरम इन्स्टिट्युट परदेशात लस उत्पादनाचा विचार

ठाकरे सरकारने डाळ सडवली

चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी

अर्थचक्र सावरले असून याआधी मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी १.२४ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मार्च महिन्याच्या तुलनेत कर संकलनात १४ टक्के वृद्धी झाली आहे. देशातील काही भागात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असले तरी अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल सुरु असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

एप्रिल महिन्यात गोळा झालेल्या जीएसटीची आकडेवारी जाहिर करण्यात आली आहे. यात सीजीएसटीमधून २७,८३७ कोटी, एसजीएसटीमधून ३५,६२१ कोटी, आयजीएसटीमधून ६८,४८१ कोटी आणि सेस (अधिभार) ९,४४५ कोटींचा कर मिळाल्याचे म्हटलं आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जीएसटीमधून तब्बल १ लाख १३ हजार १४३ कोटी मिळाले आहेत. जीएसटी महसुलाने ऑक्टोबरपासून सलग सातव्या महिन्यात एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, बनावट बिलांच्या माध्यमातून होणारी जीएसटी कर चोरीच्या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून छडा लावला जात आहे. गेल्या काही महिन्यात अशा प्रकारची हजारो कोटींचा जीएसटी बुडवणारी रॅकेट्स जीएसटी , इन्कम टॅक्स, कस्टम आयटी सेल यांनी उध्वस्त केली आहेत.

Exit mobile version