व्यावसायिकांप्रमाणेच आता सर्वसामान्यांनाही ई-रुपयामध्ये व्यवहार करता येणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ डिसेंबरपासून देशातील चार शहरांमध्ये डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापराशी संबंधित पहिली प्रायोगिक चाचणी घेण्यात येणार आहे. स्टेट बँक, आयसीआयसीआय , येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट या चार सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका चाचणीत सहभागी होतील. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. हे कायदेशीर चलन मानले जाईल. सध्या ज्या चलनी नोटा आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यावर ई-रुपया जारी केला जाईल.
१ डिसेंबर रोजी क्लोज्ड यूजर ग्रुप मधील निवडक ठिकाणी चाचणी घेतली जाईल असे रिझर्व्ह बँकने म्हटलं आहे.
डिजिटल रुपये मोबाईल फोन आणि इतर उपकरणांमध्ये ठेवता येतात. त्याचे वितरण बँकांमार्फत केले जाईल. प्रायोगिक चाचणीत सहभागी झालेल्या बँकांनी प्रदान केलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे वापरकर्ते ई-रुपयामध्ये व्यवहार करू शकतील. डिजिटल रुपयामुळे बँकांमध्ये पैसे हस्तांतरित करणे सोपे होईल, चलन छपाईचा खर्च कमी होईल, अवैध चलन रोखले जाईल, सुलभ कर संकलन, काळा पैसा आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा बसेल.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
येथे होत आहे चाचणी
सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या किरकोळ वापरासाठी पहिली चाचणी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे घेतली जाईल. त्यानंतर अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनऊ , पाटणा आणि शिमला येथे ही सेवा नंतर सुरू होईल. रशिया, चीन, सौदी अरेबिया, यूएई, स्वीडन, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, युक्रेन, कझाकिस्तान, आफ्रिका आणि . भारतासह १५ देशांमध्ये चाचणी सुरु आहे.