30 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरअर्थजगतआरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची माहिती

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसल्यामुळे आता इएमआयचा बोजा वाढणार नसल्याचा दिलासा सर्वसामान्य लोकांना आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीत याबाबत घोषणा केली. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहितीही शक्तीकांत दास यांनी दिली.

आरबीआयकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीकडून सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रेपो रेट ६.५० टक्के कायम ठेवण्याचा आरबीआयच्या पतधोरण समितीने निर्णय घेतला आहे. मागील वर्षात २.५० टक्क्यांनी आरबीआयने वाढ करत रेपो रेटमध्ये बदल केले होते. चालू आर्थिक वर्षात विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर चालू आर्थिक वर्षात महागाई दर ५.१ टक्के राहण्याची शक्यता आहे.

रेपो रेट काय आहे?

व्यावसायिक बँकांना ज्या दराने आरबीआय कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. जेव्हा आरबीआयचा रेपो रेट वाढतो, तेव्हा बँकांना आरबीआयकडून महाग कर्ज मिळते. पुढे बँक आपल्या ग्राहकांना महाग कर्ज वितरित करते. त्यामुळे रेपो रेट वाढवण्याचा बोजा बँकांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचत असतो. महागाई नियंत्रित करण्यासाठी, बाजारातील तरलता कमी करण्यासाठी रेपो रेट वाढवला जातो.

हे ही वाचा:

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, ४०० जणांचे धर्मांतर?

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

इंदिरा गांधी यांची हत्येचे चित्रण कॅनडातील चित्ररथावर

रेपो रेट वाढल्याने अर्थव्यवस्थेतील पैशाचा ओघ कमी होतो. पैशाचा प्रवाह कमी होताच मागणी कमी होऊ लागते आणि महागाई कमी होऊ लागते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा