25 C
Mumbai
Friday, November 29, 2024
घरअर्थजगतRBI चा कल सोनं गुंतवणुकीत

RBI चा कल सोनं गुंतवणुकीत

Google News Follow

Related

आपल्या देशात सोन्याचं खूप महत्व आहे. मात्र लोकांप्रमाणेच बँकांचा देखील सोनं खरेदीकडे कल वाढलाय. भारताची मध्यवर्ती आणि महत्वाची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ६५ टन सोन खरेदी केलंय. सोन्यासंदर्भातच अजून एक अहवाल समोर आलाय ज्यामध्ये भारतातील महिलांकडे जगाच्या तुलनेत ११ टक्के सोन आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात सुमारे ६५ टन सोनं खरेदी केलंय. जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे आरबीआयकडे आता सोन्याचा साठा ७६० पूर्णांक ४२ टन झालाय. आरबीआयने जून २०२० ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांत ३३ पूर्णांक ९ टन सोने खरेदी केलेले. आर्थिक वर्ष २०२१ – २२ मध्ये आरबीआयची सोन्याची रिझर्व्ह व्हॅल्यू ३० टक्क्यांनी वाढून ३ लाख २२ हजार कोटी रुपये झालीय.

भारतात सोन खरेदी कायमच सुरक्षित गुंतवणूक मानलं जात. अलीकडील जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून आरबीआयने सोने खरेदी वाढवलीय. जर भारतने डॉलरमध्ये गुंतवणूक केली तर डॉलरची किंमत कधी वाढते कधी कमी होते त्यामुळे नफा होईल असे सांगता येत नाही. म्हणून डॉलर पेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं अधिक सोपं असत. सोन्यामधून रिटर्न देखील चांगला मिळतो. कारण जी डॉलर मध्ये आपण गुंतवणूक करतो त्यामध्ये नुकसान होण्याची भीती जास्त असते.

अचानक बँका सोनं खरेदी का करू लागल्या?

२०१८ नंतर आरबीआयने लागोपाठ सोन खरेदी करण्यावर भर दिलाय. कारण २०१७ मध्ये चीनसोबत व्यापार युद्ध झालं आणि वस्तूंच्या किमती घसरल्या या सगळ्याचा परिणाम अमेरिकन डॉलरवर झाला म्हणून तेव्हापासून भारताने जास्तकरून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीय.

सध्या आरबीआयकडे जवळपास ७६० पूर्णांक ४२ टन सोन आहे. हे एवढं सोन भारत कुठे ठेवते तर या सोन्याच्या साठ्यापैकी ११ पूर्णांक ०८ मेट्रिक टन सोन्याचा ठेवींमध्ये समाविष्ट आहे. तर ४५३ पूर्णांक ५२ मेट्रिक टन सोने परदेशात म्हणजेच बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्समध्ये ठेवलय. बाकीचे २९५ पूर्णांक ८२ मेट्रिक टन सोने भारतात आहे. या सर्वामुळे देशाच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याची हिस्सेदारी ७ टक्क्यांवर पोहोचलीय.

याआधी ११९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था घसरली होती त्यावेळी भारताने बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंडकडे जवळपास भारतच ४६/४७ टन सोन गहाण ठेवलं होत आणि त्यातून जवळपास ४०५ डॉलर दशलक्ष कर्ज उभारलं होत ते कर्ज भारतने तस काही महिन्यातच फेडलं मात्र त्यांनतर २००० पासून ते २०२० पर्यंत भारतने १२ पटीने सोन्यात गुंतवणूक वाढवलीय. ही झाली भारताची गुंतवणूक पण भारतीय महिलांना देखील सोन्याची भारी हौस आहे. यामध्ये भारतीय महिलांनी भल्याभल्याना मागे टाकलंय.

हे ही वाचा:

१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी

‘या’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात

राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीचे समन्स

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’

कोणत्या देशात किती सोने आहे हे दर्शवणारा एक अहवाल नुकताच जागतिक सुवर्ण परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आला. यामधून हे समोर आलं जेवढ सध्या जगात सोन आहे त्यातील ११ टक्के सोन हे एकट्या भारतीय महिलांकडे आहे. सोन्याच्या बाबतीत भारतीय महिलांनी अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्ससारख्या देशांना देखील मागे टाकलंय. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारतात २४ हजार टन सोन आहे. त्यापैकी २१ हजार टन सोन भारतीय महिलांकडे आहे. दुसरीकडे मात्र सोन्याच्या उत्पादनात भारत मागे असल्याचं दिसून आलं पण हे चित्र देखील लवकरच बदलणार आहे. कारण बिहार मधील जमूई जिह्ल्यात देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा शोधण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. जीएसआयच्या सर्वेक्षणानुसार, या जिल्ह्यात सुमारे २२२ पूर्णांक ८ दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात सोन्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा