नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याच्या आधीचं रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना धक्का दिला आहे . तीन दिवस चाललेल्या एमपीसीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.३५% वाढ जाहीर केली आहे. आता रेपो रेट ५.४% वरून ६.२५ % झाला आहे. रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर परिणाम होणार आहे. बँका आता लवकरच कर्जाचे दर वाढवण्याचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
याआधी रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर आणि ऑगस्टमध्येही रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली होती. मे महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीतही रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ४.९०% करण्यात आला होता . पुढील चार महिन्यांत महागाई दर ४ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
एमपीसीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. रेपो रेटची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हटले की ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा दिसून येत आहे. ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जीडीपी वाढ ६.८% असू शकते. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांक ५ % वर राहू शकेल असा अंदाजही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.
किरकोळ महागाई कमी होण्याची चिन्हे आणि तज्ज्ञांच्या मते वाढीला चालना देण्याची गरज हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या आगामी पतधोरण आढाव्यात रेपो दरात ३५ बेसिस पॉइंटने वाढ करण्याचा पर्याय निवडला आहे. मंगळवारी, जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून वाढवून ६.९ टक्के केला आहे.
हे ही वाचा:
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर म्हणजे आरबीआयकडून कोणत्याही बँकेला कर्ज दिले जाते. त्या आधारे बँका ग्राहकांना कर्ज देतात. याशिवाय रिव्हर्स रेपो रेट हा दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक बँकांना त्यांच्या ठेवींवर व्याज देते. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट वाढल्याने बँकांवर बोजा वाढतो आणि बँका व्याजदर वाढवून त्याचा भर ग्राहकांवर टाकतात.