आता तब्बल २० देशातील नागरिक भारतात आल्यानंतर यूपीआयद्वारे व्यवहार करू शकतील. जी-२० देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे . त्यानुसार जी-२० देशांतून येणाऱ्या प्रवाशांना बेंगळुरू, मुंबई आणि नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यूपीआयशी जोडलेले ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट वॉलेट्स’ मिळू शकतात. या माध्यमातून भारतातील पाच कोटींपेक्षा जास्त दुकानांमध्ये व्यवहार करता येऊ शकेल असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भारताला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना यूपीआयद्वारे व्यवहार करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. जी-२० देशांतील प्रवाशांना निवडक विमानतळांवर यूपीआयशी जोडलेले ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट वॉलेट्स’ मिळू शकतील. जी-२० च्या प्रतिनिधींना विविध बैठकीच्या ठिकाणी ही सुविधा मिळेल असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. जानेवारीमध्ये १३ लाख कोटी रुपयांचे युपीआयवर आधारित व्यवहार झाले. मासिक आधारावर युपीआय द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये मध्ये १३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १३ लाख कोटी रुपयांवर गेल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हे ही वाचा: खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल! आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज… संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली! शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ? या बँकांचे असतील वॉलेट्स आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक तसेच पाइन लॅब्ज प्रायव्हेट प्राइवेट लिमिटेड आणि ट्रान्सकॉर्प इंटरनेशनल लिमिटेड या दोन बॅंकेतर वित्तीय संस्था यूपीआय लिंक्ड वॉलेट जारी करतील. जी-२० मधील या देशांचा समावेश जी-२० हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा मंच आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन , अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांचा समावेश आहे