24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगतब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं

ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं

१९९१ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं रिझर्व्हमध्ये सामील

Google News Follow

Related

भारतीय अर्थव्यवस्थेचा चढत्या आलेखाकडे सुरू असणाऱ्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनकडून १०० टनांहून अधिक सोनं भारतात आणलं आहे. सोन्याची ही घावापासी ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम पाहायला मिळेल. भविष्यात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआय देशाच्या तिजोरीतील सोन्याचे प्रमाण वाढवत असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात सर्वच बाबींमध्ये परिस्थिती बदलत आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा देशातील सोनं बाहेर ठेवले जात होते. पण आता भारत आपले सोने परत आणत आहे. १९९१ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं रिझर्व्हमध्ये सामील करण्यात आलं आहे. येत्या महिन्यात इतकं सोनं पुन्हा देशात आणण्यात येईल. आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आरबीआयजवळ ८२२.१ टन सोनं होतं. ज्यातील ४१३.८ टन सोनं परदेशात ठेवण्यात आलं होतं. आता हेच सोनं हळूहळू भारतात आणलं जात आहे. जागतिक आकडेवारीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक ही अलिकडच्या वर्षांत सोने खरेदी करणारी मुख्य मध्यवर्ती बँक आहे.

बँक ऑफ इंग्लंड हे जगभरातील सर्व केंद्रीय बँकांसाठी सर्वात मोठं साठवणुकीचं केंद्र आहे. भारतही स्वातंत्र्यापूर्वीपासून आपले सोने लंडनच्या बँकांमध्ये ठेवत आहे. अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आरबीआयने काही वर्षांपूर्वी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. परदेशात सोन्याचा साठा वाढत असल्याने थोडे सोने भारतात आणण्याचे ठरले. तसेच भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.”

हे ही वाचा:

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३४ आरोपांमध्ये दोषी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

भारतात सोने हा अत्यंत भावनिक मुद्दा मानला जातो. प्रत्येक घरात सोने असते आणि ते विकणे योग्य मानले जात नाही. परंतु १९९१ मध्ये चंद्रशेखर सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी सोने गहाण ठेवले होते. रिझर्व्ह बँकने १५ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०० टन सोने खरेदी केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा