देशात वाढत चाललेल्या महागाईमुळे रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दारात ०.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.४० टक्के झाला आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आज, ५ ऑगस्ट रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली. याआधी मे, जून महिन्यात आरबीआयने रेपो दारात एकूण ०. ९० टक्क्यांची वाढ केली होती. त्यावेळी बँक ते गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर ०.९० टक्क्यांवरून १.१५ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. त्यानंतर काल आरबीआयने रेपो दरात पुन्हा वाढ केल्याची घोषणा केली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयने ०.५० टक्क्यांनी रेपो दरात वाढ करून आता रेपो दर ५.४० टक्के झाला आहे. परिणामी गृहकर्जासह सर्वेच कर्जांचे हप्ते वाढणार आहेत.
हे ही वाचा:
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू
टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
मे महिन्यापासून आरबीआयने सलग तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे. चलनवाढ, महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर व्यवहार करत असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. जगातील इतर मध्यवर्ती बँकांनीसुद्धा रेपो दरात वाढ केली त्यामुळे भारताने मे महिन्यात रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्ह बँकेने सुद्धा गेल्या महिन्यात रेपो रेट वाढवला होता. अमेरिकेत महागाईच्या दराने उच्चांक गाठल्याने याचा परिणाम जगातील इत्तर देशांवर होत आहे.