रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

वर्षभरातच पर्यटकांच्या संख्येत ८५ पट वाढ

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

Uttar Pradesh, Aug 04 (ANI): The proposed model of the Ram Temple in Ayodhya on Tuesday. (ANI Photo)

राममंदिराच्या निर्माणासह सजणारी शरयू नगरी आस्था आणि अध्यात्मासह देशाच्या अर्थव्यवस्थेचेही प्रमुख केंद्र बनणार आहे. केवळ पर्यटनच नव्हे नवनव्या प्रकल्पांमुळेही ही नगरी विकासाचे नवे पंख घेऊन भरारी मारणार आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२१मध्ये अयोध्येत पावणेतीन लाख पर्यटक पोहोचले होते. मात्र वर्षभरातच म्हणजे २०२२ मध्येच ही संख्या ८५ पटीने वाढून दोन कोटी ३९ लाख झाली आहे.

तसेच, अर्थव्यवस्थेबाबतच बोलायचे झाले तर, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जो उत्साह सुरू आहे, तो पाहता रामलल्लाशी संबंधित साहित्यांच्या जोरावरच ५० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यापार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राममंदिराला दररोज ७० हजार भाविक भेटू देऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पद्मनाभस्वामी मंदिर, तिरुपती बालाजी, वैष्णोदेवी, सिद्धिविनायक मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरांसारखी येथे भक्तांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आकाराला येत आहेत. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे. जेणेकरून पर्यटक केवळ रामलल्लाचे दर्शन घेऊन परतू नयेत तर अयोध्येतही काही दिवस राहतील. यासाठी परिक्रमा मार्ग आणि आसपास सुमारे ६० धार्मिक स्थळे बनवण्याचा प्रस्ताव आहे.

चांगले मॉडेल लागू करावे लागेल

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अयोध्यानगरी देश-जगभरातील एक चांगला पर्याय ठरू पाहतो आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. भाविकांना अडचणी उद्भवू नयेत, यासाठी दक्षिण भारतातील मंदिरांप्रमाणे मॉडेल लागू करावे लागेल. त्यांची सुरक्षा, आरोग्य, भोजनाशी संबंधित मापदंड ठरवावे लागतील. सरकारला लघुकुटीर उद्योगावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजे पर्यटक येथे वस्तूंची खरेदी करतील आणि अयोध्येची ओळख त्यांच्या सोबत घेऊन जातील.
– प्रा. देवाशीष दासगुप्ता, भारतीय प्रबंध संस्थान, लखनऊ

हे ही वाचा:

सीएएची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच!

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, पाणबुडी प्रकल्प राज्यातचं!

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

रामध्वज, माळा, लॉकेटला पसंती

संपूर्ण देशभरात रामलल्लाशी संबंधित वस्तू मिळत आहेत. यात श्रीराम ध्वज, श्रीराम अंगवस्त्र, रामाचे चित्र असेलल्या माळा, लॉकेट, कीचेन, राम दरबाराचे चित्र, राममंदिराचे मॉडेल, सजावटीचे साहित्य, कडे आदी वस्तूंना मागणी आहे.

Exit mobile version