देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या असून देशात भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. देशातील राजकीय हालचालीनंतर शेअर बाजारावरही याचा परिणाम होत आहे. शेअर बाजार सातत्याने वधारताना दिसत आहे. शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांना फायदा होत असल्याचे चित्र आहे.
शेअर बाजारात येत असलेल्या तेजीचा फायदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही झाला आहे. या तेजीमुळे त्यांचा पोर्टफोलिओही पुढे जात असून राहुल गांधी यांचा स्टॉक पोर्टफोलिओ जवळपास ३.५ टक्क्यांनी वधारला आहे. राहुल गांधींकडे बऱ्याच कंपन्यांचे शअर्स आहेत. यात, इंफोसिस, एलटीआय माइंड ट्री, टीसीएस, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि पिडिलाइट इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक काळात भरलेल्या उमेदवारी अर्जातून ही माहिती समोर आली आहे.
निवडणूक निकालापूर्वीच्या सोमवारी बाजारात आलेल्या तेजीमुळे राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे ३.४५ लाख रुपयांची वाढ झाली होती. निवडणूक निकालाच्या दिवशी अर्थात मंगळवारी त्यांनाही मोठे नुकसान झाले होते. त्यांचा पोर्टफोलिओ जवळपास ४.०८ लाख रुपयांनी घसरला होता.पण, बुधवारपासून सातत्याने हा पोर्टफोलिओ सातत्याने वाढताना दिसत आहे.
निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच बुधवारपासून शेअर बाजारात तेजी यायला सुरुवात झाली. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, ५ जूनला राहुल गांधींचा पोर्टफोलिओ जवळपास १३.९ लाख रुपयांनी वधारला. यात ६ जूनलाही जवळपास १.७८ लाख रुपयांची तेजी आली. राहुल गांधींचा पोर्टफोलियो ३१ मेपासून आतापर्यंत ३.४६ टक्क्यांनी वधारला आहे. त्यांना जवळपास १५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे.
हे ही वाचा:
पुणे अपघातातील आपल्वायीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!
या आठवड्यात शेअर बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेता हा चढ-उतार अपेक्षित मानला जात होता. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी सत्ताधारी भाजपाला बहुमत न मिळाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल ३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, पुढील तीन व्यवहारांच्या सत्रातच बाजार वेगाने रिकव्हर झाला. गुंतवणूकदारांची संपत्ती २८.६६ लाख कोटी रुपयांनी वधारली आहे.