‘रबी’च्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता

‘रबी’च्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता

यंदा देशाच्या रबी उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी १५३.२७ मिलियन टन धान्याचे उत्पादन झाले होते. यावर्षी (२०२०-२१) मागच्या वर्षीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे.

रबीचा पेरणी हंगाम खरिफ हंगामातील पिकांच्या कापणी नंतर लगेच सुरू होतो. हा साधारणतः हिवाळ्यातील ऑक्टोबर महिन्याचा काळ असतो. या हंगामात गहू आणि मोहरी ही दोन प्रमुख पिके आहेत. शेती हंगाम जुलै ते जुन या महिन्यांत धरला जाते.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना तोमर यांनी सांगितले की २०२० या वर्षात कृषी क्षेत्राची कामगिरी उत्तम राहिली आहे. खरीफ हंगामात, कोविड-१९ महामारीचा सामना करत शेतकऱ्यांनी केलेल्या मेहेनतीमुळे या हंगामातील उत्पादन विक्रमी आले आहे. त्यामुळे यावर्षी रबी हंगामात देखील उत्तम उत्पादन होण्याची आम्हाला आशा आहे.

२०२०-२१च्या शेती हंगामात केंद्राने ३०१ मिलियन टन उत्पन्नाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यापैकी १५१.६५ मिलियन टन उत्पादन रबी हंगामातून मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दोन शेतकरी कायद्यातील सुधारणांमुळे देखील शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version